विसराळूपणा होईल दूर, दररोज खा ‘हा’ पदार्थ

रोजची धावपळ आणि धकाधकीत आपलं आहाराकडे होतं दुर्लक्ष.

त्यामुळे विविध आजार आणि व्याधींचा करावा लागतो सामना.

तंदुरुस्त राहण्यासाठी घ्यावा वेळच्या वेळी सकस आहार.

दररोज मखाना खाणं आरोग्यासाठी असतं फायदेशीर.

छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात...

तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर त्यांना वाढत्या वयात दररोज द्या किमान 10 ते 20 ग्रॅम मखाने.

मखान्यांमधून मिळतं भरपूर कॅल्शियम.

ड्राय रोस्ट करून, तळून, गूळ घालून, ड्रायफ्रूट्स घालून, लाडू बनवून, खीर बनवून, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता मखाना.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मखाना खाल्ल्यास त्यांची जेवणानंतरची साखरेची पातळी आटोक्यात येण्यास होते मदत.

ज्यांना प्रत्येक गोष्टीची करून द्यावी लागते आठवण त्यांनी आवर्जून खायला हवा मखाना. त्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होण्यास मिळते मदत.