सावधान! तुम्ही दिवसभर AC मध्ये बसत नाही ना? नाहीतर...

एसीच्या वातावरणात बसलं की जीवाला अगदी गारवा मिळतो.

कदाचित हा गारवा काही काळाचा ठरू शकतो.

कारण जास्त वेळ एसीच्या वातावरणात बसणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं.

देहरादूनचे डॉ. सुशील ओझा सांगतात की,

दिवसभर एसीच्या वातावरणात राहिल्यास डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.

यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो.

त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

उन्हात जाताना गॉगल वापरावा.

तसंच दर विसाव्या सेकंदाला डोळ्यांची उघडझाप करावी.