रक्ताची कमतरता भरून काढते स्ट्राॅबेरी

बाजारात हंगामानुसार विविध फळं आणि भाज्यांची पाहायला मिळते रेलचेल.

थंडी सुरू झाल्यापासून आली आहेत नवनवीन फळं. यात समावेश आहे लालचुटूक, स्वादिष्ट स्ट्राॅबेरीचा.

रसरशीत, गोड, काहीशी आंबट अशी स्ट्राॅबेरी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वचजण खातात आवडीने.

साधारण 100 रुपयांना 250 ग्रॅम इतकी या फळाची असते किंमत. म्हणजेच 400 रुपये किलो दराने विकली जाते स्ट्राॅबेरी.

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये घेतलं जातं स्ट्रॉबेरीचं उत्पादन. स्ट्रॉबेरीचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे.

या फळाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात सी जीवनसत्त्वही चांगल्या प्रमाणात असते.

स्ट्रॉबेरीच्या हाय अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोगापासून संरक्षण होते.

स्ट्रॉबेरीमुळे त्वचादेखील छान तजेलदार राहते. वजन कमी होण्यासाठी मदत होते.

स्ट्रॉबेरी शरिरातील रक्ताची कमतरता भरून काढते. गरोदर महिलांना स्ट्रॉबेरी खाण्याचा दिला जातो सल्ला.