त्वचेसह विविध आजारांवर गुणकारी जांभळाचं मध!

जांभूळ नसतं केवळ चवीला स्वादिष्ट, तर असतं औषधी गुणांनी परिपूर्ण.

तुम्हाला माहितीये का, जांभळांपासून बनवलं जातं मध.

आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे आणि औषधी वनस्पतींचे जाणकार शुभम श्रीवास्तव सांगतात की, मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी असतं जांभळाचं मध उपयुक्त. 

मधुमेह आणि मध? वाचायला जरी खटकलं, तरी या मधात ग्लायसेमिक इंडेक्स असतं कमी.

त्यामुळे हे मध रक्तातील साखर ठेवतं नियंत्रित.

प्रचंड तहान लागणं, सतत लघवी होणं ही आहेत मधुमेहाची सर्वसामान्य लक्षणं, जी जांभळाच्या मधामुळे होतात बरी.

या मधात असतं अँटीऑक्सिडंट, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य राहतं सुदृढ.

खोकला, सर्दी आणि घसादुखीवर या मधामुळे मिळतो आराम.

जेव्हा मधमाशी जांभळाच्या झाडावरील फुलांमधून रस काढून तयार करते मध, तेव्हा त्याला म्हटलं जातं जांभळाचं मध.