प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी भव्य राम मंदिर तयार!

अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान श्रीराम विराजमान होण्याची तारीख जसजशी येतेय जवळ, तसतसं राम मंदिराचं बांधकाम होतंय वेगवान.

राम मंदिर ट्रस्टने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत बांधकामाचे लेटेस्ट फोटो.

अयोध्येत 22 जानेवारीला पार पडणार आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळा.

या सोहळ्यासाठी मंदिर पूर्ण बांधून झालं आहे तयार. आता मारला जातोय शेवटचा हात.

राम मंदिराचं पूर्ण बांधकाम आहे नागर शैलीत. त्यामुळे मंदिर दिसतं अतिशय सुरेख आणि आकर्षक.

मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर आहे देवी-देवतांच्या मूर्तीचं नाजूक कोरीवकाम.

हे बांधकाम अशारितीने करण्यात आलंय की, दिवसाच्या उजेडात मंदिराच्या भिंती चमकदार दिसतीलच.

मात्र रात्रीच्या अंधारातदेखील मंदिराचं सौंदर्य स्पष्टपणे पाहता येईल.

भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यजमानाच्या भूमिकेत पाहायला मिळतील.