'या' एका सवयीमुळे बदलेल तुमचं आयुष्य; पण आज नको, उद्यापासून करा सुरुवात

ही सवय म्हणजे 'सकाळी लवकर उठणे'. जिचे आहेत भन्नाट फायदे.

सकाळच्या व्यायामामुळे शरिराची चरबी होते कमी. दिवसभर शरीर राहतं ऊर्जावान.

सकाळी नुसतं चालल्यानंच अन्नपचन होतं सुरळीत.

महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या व्यायामामुळे हृदय राहतं सुदृढ.

योगासनांमुळे हृदयाशीसंबंधित आजार होतात दूर.

शिवाय रक्ताभिसरण होतं व्यवस्थित.

सकाळच्या शुद्ध हवेमुळे फुप्फुसही राहतं उत्तम.

म्हणून फक्त वॉक का होईना पण सकाळी शरिराची हालचाल होणं आहे आवश्यक.

...आणि त्यासाठी सकाळी लवकर उठणं आहे महत्त्वाचं.