विदेशी प्रजातीचे कुत्रे साधारणतः 1 लाख रुपये किंमतीत मिळतात. त्यामुळे ते खरेदी करणं सर्वांच्याच आवाक्यात नसतं.
परंतु तुम्ही कधी कोट्यवधींच्या कुत्र्याबाबत ऐकलंय का?
होय, प्राणीप्रेमी पाळीव प्राण्यांसाठी कोट्यवधी रुपयेदेखील खर्च करतात.
तेलंगणाच्या हैदराबादमधील मदिनागुडा भागात कॉकेशियन शेफर्ड या दुर्मीळ प्रजातीचा कुत्रा आढळला आणि लोक त्याला बघतच बसले.
इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशन, बंगळुरूचे अध्यक्ष सतीश यांचा हा पाळीव कुत्रा.
या कुत्र्याचं रूप पाहून, त्याची किंमत ऐकून लोक अक्षरश: हैराण झाले.
मग काय...त्याला बघायला, त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला एकच झुंबड उडाली.
रशियन प्रजातीच्या या कुत्र्याची किंमत आहे तब्बल 20 कोटी रुपये.
एवढ्या पैशात 10 बंगले आणि 100 Mahindra Thar सहज येतील.