25 मार्चला लागलं वर्षातलं पहिलं ग्रहण.
कन्या राशीत सुरू झालं चंद्रग्रहण.
याच राशीत राहू आधीपासून होता विराजमान.
ज्योतिषांनी सांगितलं की, या ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम हा कन्या राशीवरच होईल.
या राशीच्या व्यक्तींना प्रचंड आर्थिक लाभ होईल.
शिवाय आयुष्यात सुख, समृद्धी येईल.
परंतु कितीही पैसा मिळाला तरी आता गुंतवणूक करू नका, त्यातून नुकसान होऊ शकतं.
दाम्पत्य जीवनात मात्र आनंदच आनंद येईल.
करियरमध्येही प्रगती होईल.
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही माहिती दिली आहे.