कुंडलीत असेल सूर्य ग्रहदोष. सूर्य राहू, केतू किंवा पितृदोषाने असेल पीडित तर ओक वृक्षाची करावी पूजा. सूर्य देवाच्या बीज मंत्राचा करावा जप.
कुंडलीत असेल चंद्रदोष, तर पळसाची करावी पूजा. महादेवांना दररोज अर्पण करावं जल. यामुळे सर्व अडचणी होतील दूर.
मंगळदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करावी वडाची पूजा. 11 मंगळवारी जल अर्पण करून 5 वेळा वटवृक्षाला घालाव्या परिक्रमा.
कुंडलीत असेल बुध कमकुवत, तर आपल्यासाठी ठरतं घातक. अशावेळी करावी अघाडाच्या रोपाची पूजा.
कुंडलीत गुरूवर असेल राहू, केतू किंवा मकर राशीचा प्रभाव तर निर्माण होतो दोष. अशावेळी करावी पिंपळ वृक्षाची पूजा.
शुक्रावर पडली इतर ग्रहांची अशुभ सावली की, निर्माण होतो दोष. आयुष्यातल्या सर्व सुख-सुविधा होऊ शकतात नष्ट.यावर उपाय म्हणून करावी उंबराच्या झाडाची पूजा.
शनीदेवाचा कोप असतो सर्वात घातक. यामुळे सुरू होते साडेसाती. यावर अवघड उपाय करणं शक्य नसेल, तर करावी शमी वृक्षाची पूजा.
कुंडलीत चुकली राहू, केतूची स्थिती की आलीच म्हणून समजायची साडेसाती. राहूच्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करावी दर्भ गवताची पूजा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)