थंडीत खा 'हे' 5 पदार्थ, वाटेल cozy

चवीला गोड आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण मध शरिराला देतं ऊर्जा.

मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. घशाची खवखवही दूर होते.

देशी तुपात फॅटी अ‍ॅसिड असतं चांगल्या प्रमाणात. ज्यामुळे शरिरात निर्माण होते उब, तापमान राहतं सामान्य.

थंडीत दररोज देशी तूप खाणं असतं अत्यंत फायदेशीर.

गुळात असतात भरपूर कॅलरीज. शिवाय गुळामुळे होते पचनक्रिया सुरळीत.

नुसतं गूळ खायला आवडत नसेल, तर गोडाच्या पदार्थांमध्ये करू शकता गुळाचा समावेश.

दालचिनीमुळे मेटाबॉलिज्मचं प्रमाण वाढतं. दालचिनीचं पाणी प्यायल्यावर खोकलाही बरा होतो.

फोडणीत तडतडणारी मोहरी शरिरातलं तापमान उबदार ठेवण्यास ठरते फायदेशीर.

त्यामुळे थंडीत जेवणात मोहरी आणि मोहरीच्या तेलाचा समावेश करण्याचा दिला जातो सल्ला.