विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात जेवणापासून राहणीमानापर्यंत प्रत्येक गोष्टीत आढळते विविधता.
भारताच्या डोंगराळ भागात उगणाऱ्या धान्यापासून अतिशय स्वादिष्ट असे पदार्थ बनवले जातात. त्यांपासून थंडीत पोषक तत्त्व मिळवले जातात.
काळे बिन्स पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. यापासून सूप, सलाड, स्मूदी, वरण असे विविध पदार्थ बनवले जातात.
डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आहारात काळ्या बिन्सच्या वरणाचा प्रामुख्याने समावेश असतो.
कुळीथाच्या डाळीत अँटीऑक्सिडंट तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. या डाळीमुळे शरीर पूर्ण स्वच्छ होतं. अगदी किडनी स्टोनचा त्रास बरा होण्यासही मदत मिळते.
भांग प्यायल्यास नशा येते असं म्हणतात. परंतु याच भांगेची शेती केली जाते आणि तिचं योग्य पद्धतीने सेवन केल्यास शरिराला अनेक फायदे होतात, असंही म्हटलं जातं.
भांगेच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शिवाय यामुळे तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते.
डोंगराळ भागातील लोक उत्सवांदरम्यान सेल नावाचा पदार्थ बनवतात.
तांदूळ वाटून त्याचे गोळे कढईत तळून गोड सेल बनवून आवडीने खाल्ले जातात.