हिंदू परंपरेनुसार, कार्तिकी एकादशीपासून होते शुभकार्यांची सुरुवात.
येत्या 23 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी. तेव्हापासून सुरू होईल लग्नसराई.
हिंदू धर्मात शुभ मुहूर्तावरच पार पडतं कोणतंही शुभ कार्य. ग्रह, ताऱ्यांची स्थिती पाहूनच एखाद्या विशिष्ट कार्याचं केलं जातं आयोजन.
लग्न म्हणजे दोन व्यक्तींची जन्मोजन्मीसाठी गाठ. त्यामुळे हे कार्य शुभ मुहूर्तावरच पार पडायला हवं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
ज्योतिषी पंडित अमरनाथ द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे, ते 23 नोव्हेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत शुभ मुहूर्तावर हे कार्य पार पाडू शकतात.
नोव्हेंबर महिन्यात 3 आणि डिसेंबर महिन्यात 8 असे यंदा एकूण 11 मुहूर्त आहेत. 15 डिसेंबरनंतर मात्र शुभ मुहूर्तासाठी पुढील वर्षाची पाहावी लागेल वाट.
ज्योतिषांनी सांगितलं की, नोव्हेंबर महिन्यात 24, 27 आणि 29 तारखेला आपण लग्न करू शकता.
डिसेंबर महिन्यात 3, 4, 7, 8, 10, 13, 14, आणि 15 या 8 तारखा लग्न कार्यासाठी आहेत सर्वोत्तम.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)