रक्त आणि हृदय सुदृढ ठेवतं तुळशीचं पान

आयुर्वेदात तुळशीला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

तुळशीच्या पानांमध्ये असतं झिंक.

तुळशीतून मिळतं आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए आणि ई.

तुळस अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक्स गुणांनी असते परिपूर्ण.

तुळशीच्या पानांमुळे बरे होतात अनेक आजार, शिवाय सुदृढ राहतात केस आणि तुकतुकीत होते त्वचा.

हिवाळ्यातील साथीच्या आजारांमध्येही तुळशीच्या पानांमुळे मिळतो आराम.

तुळशीतल्या यूजेनॉलमुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती. परिणामी समर्थपणे सामना करता येतो विविध आजारांशी.

तुळशीची पानं दिसायला असली लहान तरी आहेत त्यांचे मोठे फायदे. 

ही लहान-लहान पानं शरिरातलं कोलेस्ट्रॉल करतात कमी. रक्तातली साखर ठेवतात नियंत्रणात. शिवाय हृदय आणि रक्तदाबासाठीही ही पानं असतात गुणकारी.