साथीच्या आजारांपासून लहान मुलांना जपा!

बदलत्या हवामानात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात जडतात साथीचे आजार.

पालकांनी सतर्क राहून त्यांची विशेष काळजी घेणं असतं आवश्यक.

बारीकशी कणकण, अधूनमधून खोकला, काहीशी अंगदुखी, डोकेदुखी ही साधारण लक्षणं असू शकतात. पण...

मुलांना खोकला झालेला असताना श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जा.

सुरुवातीला साधा वाटणारा हा आजार आपल्याला कळणारही नाही इतक्या झपाट्याने गंभीर रूप धारण करू शकतो.

कदाचित मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळही येऊ शकते. ती येऊ नये, म्हणून सुरुवातीलाच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं योग्य ठरेल.

आपलं बाळ जर 6 महिन्यांहून कमी वयाचं असेल, तर त्याला आईचं दूध मिळणं अनिवार्य आहे.

त्याला वेळोवेळी पोलिओ लसही द्यावी.

जेणेकरून कोणत्याही साथीच्या किंवा विषाणूजन्य आजारापासून बाळाचं संरक्षण होईल.