मासेमारांना समुद्रात एखादा भलामोठा, आगळावेगळा मासा आढळला की, वाटतं आश्चर्य.
जाळ्यात जर साप अडकला तर...काय भंबेरी उडत असेल याचा आपण लावू शकत नाही अंदाज.
आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये सागर नगरात एका मासेमाराला समुद्रात आढळला एक अत्यंत दुर्मीळ साप.
समुद्राच्या तळाशी राहणारा हा साप जाळ्यात वर आल्याचं पाहून मासेमाराचे हात-पाय थरथरू लागले.
हा साप असतो प्रचंड खतरनाक. मुळात समुद्रतळाशी राहणारे साप असतात अत्यंत विषारी.
हा साप एखाद्या व्यक्तीला चावला की, घरी जाणं दूरच...समुद्रकिनारी येता-येताच व्यक्तीचा होतो मृत्यू.
हायड्रोफिस (Hydrophis) असं या सागरी सापाचं नाव. समुद्रातले लहान मासे आणि गवत खाऊन तो राहतो जिवंत.
खाण्यासाठी माश्यांच्या शोधात असतानाच तो मासेमारांच्या जाळ्यात अडकतो. परंतु माणसांना दिसू नये म्हणून पोहत पोहत तळाशी जाऊन निवांत जगतो.
विशाखापट्टणममधल्या मासेमारांना जाळ्यात साप अडकलाय हे वेळेत कळलं आणि त्यांनी त्याला ताबडतोब पाण्यात सोडलं म्हणून अनर्थ टळला.
नाहीतर हा साप सात फूट लांबीचा भलामोठा होता...