दिवाळीला देवी लक्ष्मीला नेमका काय दाखवावा नैवेद्य?

दिवाळीला लक्ष्मीपूजनातून मिळतं विशेष फळ.

यामुळे अडचणी होतात दूर आणि आर्थिक स्थिती होते भक्कम.

हरिद्वारचे ज्योतिषी श्रीधर शास्त्री सांगतात...

लक्ष्मी देवीला नैवेद्य अर्पण करणं मानलं जातं अत्यंत शुभ.

विशेषत: पांढरी मिठाई आणि खीर अर्पण केल्यास लक्ष्मी देवी होते प्रसन्न, असं म्हणतात.

तसंच दूध-तांदळाच्या खिरीमुळे पत्रिकेतला शुक्र दोष होऊ शकतो दूर.

असं म्हणतात की, भाविकांच्या कल्याणासाठी दिवाळीत साक्षात देवी लक्ष्मी येते पृथ्वीवर.

म्हणूनच लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची करतात साफसफाई.

तसंच दिवाळीत पूजेवेळी दारं, खिडक्या उघडी ठेवावी, असा ज्योतिषी देतात सल्ला.

सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Disclaimer: