केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, देशात सात टप्प्यांत पार पडतील लोकसभा निवडणुका.
या घोषणेसोबतच लागू झाली आचारसंहिता.
लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असते जिथं मतदान होणार आहे.
मतदानाची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते आणि मतदान होईपर्यंत लागू असते.
विविध पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आचारसंहितेच्या नियमांचं पालन करणं असतं आवश्यक.
त्या नियमांचं उल्लंघन केल्यास नेत्यांना भरावा लागतो दंड.
निवडणूक प्रचारासाठी सार्वजनिक मालमत्तेचा वापर करता येत नाही.
मतदान होईपर्यंत कोणतीही सरकारी घोषणा किंवा जाहिरात करता येत नाही.
राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणं अमान्य आहे.