नवरी तांदूळ मागे का फेकते?

हिंदू धर्मातील विवाहसोहळ्यात प्रत्येक विधी आणि प्रथेला आहे विशेष महत्त्व.

लग्नात पाठवणीच्या वेळी नवरी ताटातले तांदूळ मागे फेकते आणि नंतर मागे वळून पाहत नाही.

लग्नात हा विधी का केला जातो?

वर्ध्यातील पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे सांगतात...

लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर वरात निघताना नवरीची ओटी भरली जाते. त्यातले तांदूळ ती पाचवेळा ओंजळीत भरून मागे फेकते.

नवरीच्या मागे उभ्या असलेल्या महिला हे तांदूळ आपल्या पदरात झेलतात.

हा विधी केल्यास नवरीचं माहेर धनधान्याने सदैव समृद्ध राहतं, अशी मान्यता आहे.

खरंतर मुलगी ही घरची लक्ष्मी असते. त्यामुळे तिच्या पाठवणीवेळी हा विधी केल्यास तिच्या माहेरी कधीच अन्नधान्याची आणि पैशांची कमतरता भासत नाही.

तसंच या विधीतून नवरी लहानपणापासून सांभाळ केल्याबद्दल आपल्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असते.