Fitnessसाठी जिम करावं, पण त्यासाठी योग्य 'वय' हवं!

जिम करण्यासाठी एक योग्य वय असतं, हेच अनेकजणांना माहित नसतं.

जिम ट्रेनर संदीप काय सांगतात पाहूया...

5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलं रनिंग आणि जंपिंग हे व्यायाम करू शकतात.

स्विमिंग, जिम्नॅस्टिक, योगासनं केली आणि विविध मैदानी खेळ खेळले तर उत्तमच.

16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलं जिम करायला सुरूवात करू शकतात.

मात्र आपण ट्रेनरच्या देखरेखीखालीच व्यायाम करावा.

सकाळी जिम केल्यास शरिरासाठी फायदेशीर ठरतं.

त्यामुळे गूड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्तदाब प्रमाणात राहतं.

लक्षात घ्या, वर्कआऊटच्या आधी न विसरता ड्रायफ्रूट्स खावे.