'Break'fast चुकवू नका! उपाशीपोटी घराबाहेर का पडू नये?

धकाधकीचं जीवन आणि अवेळी जेवण असतं आरोग्यासाठी नुकसानकारक.

सकाळच्या गडबडीत अनेकजण नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट न करताच पडतात घराबाहेर.

कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी सांगतात...

उपाशीपोटी घराबाहेर पडल्यास ना कुठे मन लागतं, ना कुठे बुद्धिमत्ता काम करते.

कित्येकदा त्याचा परिणाम आपल्याला दिवसभरसुद्धा भोगावा लागतो.

रात्रभर झालेला फास्ट म्हणजेच उपवास सकाळी ब्रेक होतो म्हणून नाश्त्याला इंग्रजीत 'ब्रेकफास्ट' म्हणतात.

सकाळचा नाश्ता शरिरासाठी असतो मोठा ऊर्जास्रोत. 

ही ऊर्जा दैनंदिन कामासाठी असते महत्त्वाची.

आपलं काम कोणत्याही पद्धतीचं असलं तरी ऊर्जेसाठी सकाळच्या नाश्त्याला नसतो कोणताही पर्याय.