तुम्हाला माहितीये मेट्रोच्या खांबांवर आकडे कसले असतात?

देशभरात जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात आलीये मेट्रो.

अनेकजण वेळ वाचवण्यासाठी मेट्रोने करतात प्रवास.

मेट्रोचा प्रवास असतो वेगवान आणि आरामदायी.

तुम्ही रस्त्यावरून जाताना कधी मेट्रोच्या खांबांचं निरीक्षण केलंय का...

या प्रत्येक खांबावर एक विशिष्ट नंबर असतो.

हा नंबर नेमका कसला असतो?

आज आपण या नंबरामागचं कारण जाणून घेऊया.

जेव्हा मेट्रोचे खांब तयार होतात, तेव्हा त्यांचं काम अनेक फेजमध्ये चालतं.

त्यामुळे हे नंबर ते खांब तयार करणाऱ्या मजुरांच्या माहितीसाठी दिलेले असतात.

तसंच एखादा रस्ता लक्षात ठेवण्यासाठीसुद्धा हे नंबर उपयोगी पडतात.