उन्हाळ्यात फ्रिजमधलं नाही, मडक्यातलं पाणी पिण्याचे फायदे

मातीच्या मडक्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी असतं फायदेशीर. 

मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी मडक्यातलं पाणी आवर्जून प्यावं. 

हे पाणी सामान्य पाण्यापेक्षा थोडं थंड असतं.

ते केवळ चवदार लागत नाही, तर त्याने जीवही थंड होतो. 

मडक्यातल्या पाण्याने घसा खराब होत नाही. 

मातीच्या मडक्यातलं पाणी प्यायल्याने उन्हाचाही त्रास होत नाही. 

यात कोणत्याही प्रकारचे टॉक्सिक केमिकल्स नसतात. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाण्यामुळे पोट अजिबात बिघडत नाही. 

मातीच्या मडक्यातलं पाणी चार तासांनंतर आपोआप स्वच्छ होतं.