बोटं मोडल्यावर येणारा आवाज हाडांचा नसतो! मग कुठून येतो?

नकळत जरी हाताची बोटं मोडली, तरी कट कट असा आवाज येतो.

हा आवाज नक्की हाडांचा असतो का? तर नाही.

बोटं जिथे जॉईंट होतात तिथे असतो एक द्रवपदार्थ.

या द्रवात भरपूर असतं कार्बनडाय ऑक्साइड.

जेव्हा आपण बोटं मोडायला सुरुवात करतो...

तेव्हा कार्बनडाय ऑक्साइडचे बुडबुडे पटापट फुटायला लागतात.

त्यातूनच कट कट असा आवाज येतो.

काही लोकांच्या बोटांमधले बुडबुडे पटापट फुटतात.

त्यामुळे जेव्हा जेव्हा ते बोटं मोडतात, तेव्हा तेव्हा आवाज येतो.