ज्योतिषी पंडित विष्णू दाधीच यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदी हा शुद्ध आणि पवित्र धातू आहे.
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी चांदीच्या भांड्यांचा वापर केला जातो.
वास्तूशास्त्रात चांदीची भांडी शुभ मानली जातात.
या भांड्यांच्या वापरामुळे घरात सुख-समृद्धी येते.
चांदीच्या वापरामुळे कुंडलीतील चंद्र आणि शुक्राची स्थिती भक्कम होते.
घरात स्टीलची, काचेची आणि पितळेची भांडी असतात, मात्र चांदीची भांडी सर्वात शुभ मानली जातात.
आर्थिक कारणांमुळे आपण जेवणासाठी चांदीची भांडी वापरू शकत नसाल, तर निदान शुभ कार्यांमध्ये त्यांचा वापर नक्की करावा, असा सल्ला ज्योतिषी देतात.
चांदीचा दिवा, वाटी, घंटा, कलश, इत्यादींमुळे घरात सुख-समृद्धीचं वातावरण नांदतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)