काशी विश्वनाथच्या दर्शनासह आपण इथल्या अनेक नयनरम्य ठिकाणी देऊ शकता भेट.
काशीमध्ये आहे हा सुंदर धबधबा, जिथं दूरदूरहून दाखल होतात पर्यटक.
शहरापासून 70 किमी दूर नौगडच्या जंगलात आहेत राजदारी आणि देवदारी धबधबे.
घनदाट जंगलात वसलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आहे आकर्षणाचं केंद्र.
चंद्रप्रभा धरणाचं पाणी 70 मीटर उंचीवरून कोसळतं, त्यातून तयार होतो हा सुरेख धबधबा.
शहरापासून 50 किमी दूर आहे लखनिया दरी धबधबा.
हा धबधबा आहे वाराणसीला लागून असलेल्या मिर्झापूर जिल्ह्यात.
मिर्झापूर जिल्ह्यातच आहे सिद्धनाथ दरी धबधबा.
सोनभद्र जिल्ह्यात आहे मुक्खा धबधबा.