या शाळेत शिकते धोनीची मुलगी, फी किती माहितीये का?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एम एस धोनी यांना एक मुलगी आहे.

आपल्या वडिलांसारखीच जीवाही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

जीवा ही झारखंडची राजधानी रांची येथील टॉरियन वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

ही शाळा रांचीपासून 10 किमी अंतरावर खंटी रोडवर आहे.

9 वर्षांची जीवा तिसऱ्या इयत्तेत शिकते. 

शाळेच्या वेबसाईटवर तिच्या फीबाबत माहिती दिली आहे. 

टॉरियन वर्ल्ड स्कूलची पहिली ते पाचवीची वार्षिक फी 2 लाख 95 हजार रुपये आहे. 

ही एक बोर्डिंग शाळा आहे. बोर्डिंगच्या मुलांची फी याठिकाणी 4 लाख 70 हजार रुपये आहे.

जीवा डे स्कॉलर आहे, म्हणजे ती आपल्या घरुनच ये-जा करते.