Maha Shivaratri 2024: शिवलिंगावर कोणती फुलं अर्पण करावी

बेल महादेवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. शिवरात्रीला भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतात.

बेल

कमळ शुद्धता आणि दैवी सौंदर्याचं प्रतिक मानलं जातं. शिवलिंगावर हे फुल आकर्षक दिसतं

कमळ

सुगंधी चाफ्याची फुले पूजेत शुद्धता आणतात. शंभू महादेवाच्या आशीर्वादासाठी शिवलिंगावर अर्पण करावी.

सोनचाफा

धतुरा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. धतुऱ्याची फुले शिवपूजेसाठी आवश्यक आहेत.

धतुरा

चमेलीची फुले शुद्धता, नम्रता आणि शुभता दर्शवतात. दैवी कृपा प्राप्त करण्यासाठी शंकराला अर्पण करावी.

चमेली

झेंडूची फुले आकर्षक आणि सकारात्मक ऊर्जा, शुभतेचे प्रतिक आहेत. प्रार्थना आणि विधींमध्ये शंकराला अर्पण केली जातात.

झेंडू

गुलाब म्हणजे प्रेम आणि भक्तीचं प्रतिक. शिवलिंगावर आपण गुलाब अर्पण करू शकतो.

गुलाब

जास्वंदीला हिंदू पौराणिक कथांमध्ये दैवी प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर अर्पण करू शकता.

जास्वंदी