महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते.
गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी 45 ते 50 रुपये किलो विक्री होणारा कांदा आता 15 ते 20 रुपये किलोवर येऊन ठेपलाय.
निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलंय.
या दरात खर्चही निघत नसल्याने शेकरी हैराण झाला आहे.
त्यामुळे कांद्याबाबत हमीभाव देण्याची मागणी धाराशिवमधील शेतकऱ्यांकडून होत आहे.
कांदा पिकवण्यासाठी उत्पादन खर्च जास्त आहे.
रोप तयार करण्यापासून कांदा लागवड, फवारणी, रासायनिक खत, त्याचबरोबर कांदा काढणी करून बाजारात विक्री करण्यापर्यंत एका एकरासाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो.
त्यामुळे कांदा 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री झाला तरच परवडतो.
तरच शेतकऱ्यांना चार पैसे राहतात, असे कांदा उत्पादक शेतकरी बालाजी पाटील सांगतात.