Mahashivratri: महाशिवरात्रीला या रंगाचे कपडे घालून करावी पूजा

महाशिवरात्री हा हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो.

जाणून घेऊया महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करताना कपड्याच्या रंगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

शिवरात्रीला पूजा करताना महादेवाचा आवडता रंग धारण करणे शुभ मानले जाते.

महाशिवरात्रीला शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हिरवे वस्त्र परिधान करून त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

हिरवा रंग भगवान शंकराला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे महादेवाची कृपा लवकर होऊ शकते.

त्यामुळेच पूजेत त्यांना हिरव्या रंगाचे बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी साहित्य अर्पण केले जाते.

याशिवाय तुम्ही पांढरा, पिवळा आणि लाल रंगही वापरू शकता.

महाशिवरात्रीला शंकराची पूजा करताना चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका.