सेवाग्राम आश्रमाच्या परिसरात राहायचेय?
सेवाग्राम आश्रमाच्या परिसरात राहायचेय?
महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने वर्धा जिल्ह्याची जगभरात ओळख निर्माण झाली आहे.
दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट देत असतात.
सेवाग्रामात आलं की महात्मा गांधींचा सहवास लाभलेल्या परिसरात राहण्याची अनेकांची इच्छा असते.
अशा पर्यटकांसाठी सेवाग्राम आश्रमाच्या अगदी समोर हिरवळीने नटलेला यात्री निवास आहे.
या ठिकाणी तुमची राहण्याची उत्तम व्यवस्था होऊ शकते असे व्यवस्थापक नामदेवराव ढोले सांगतात.
पर्यटकांचा ओढा वाढल्याने 43 वर्षांपूर्वी आश्रमाच्या जवळच हे यात्री निवास बांधण्यात आले.
या ठिकाणी एका वेळेस 188 लोक अगदी कमी खर्चात राहू शकतात.
इथं 2 बेडच्या रुमसाठी 560 रुपये, 3 बेड रुम 840 रुपये, टू बेड व्हीआयपी सूट 1680 रुपये असे दर आहेत.
सर्वसामान्यांसाठी 8, 16 बेडचे हॉल असून इथं 168 रुपयांत राहण्याची व्यवस्था होते.
या ठिकाणी 8-10 दिवस राहता येतं मात्र महात्मा गांधींचे स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात.