मकर संक्रांती दरवर्षी एकाच तारखेला का?

मकर संक्रांती दरवर्षी एकाच तारखेला का?

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही.

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. 

प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 

फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत, मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. 

याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे. 

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही. 

कारण हा सण सूर्याच्या कॅलेंडरनुसार असतो तर बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर असतात. 

सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते. याआधी 2016 मध्ये संक्रांत 15 जानेवारी रोजी होती.

मकर संक्रांतीमागे नेमकी काय आहे धार्मिक मान्यता?