कमी मेहनतीत बाथरुम करा चकाचक, पिवळे डाग झटक्यात होतील गायब 

बाथरुम हे दिवसातून अधिक काळ ओलसर, कोंदट असते.

स्वच्छतेकडे थोडेही दुर्लक्ष झाले तर फरशा, टाईल्स पिवळट होतात.

हा पिवळसर रंग एकदा चढला की लवकर निघत नाही 

हा पिवळट, काळपट रंग कमीतकमी मेहनतीत कसा काढून टाकायचा? 

व्हाईट व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड हे दोन्ही पदार्थ समप्रमाणात घ्या.

सर्वप्रथम बाथरुमच्या भिंतींवर थोडं पाणी शिंपडून ओलसर करून घ्या. 

यानंतर व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड यांचं मिश्रण भिंतींवर शिंपडा. 

10 ते 15 मिनिटे ते तसंच राहू द्या, त्यानंतर ब्रश घेऊन ते घासून काढा.

खूपच कमी वेळेत आणि कमी मेहनतीत सर्व पिवळट डाग निघून जातील. 

हा उपाय केल्याने तुमचे बाथरुम एकदम चकाचक होऊन जाईल.