गाजर आणि बिटाची आरोग्यदायी चटणी

गाजर आणि बिटाची आरोग्यदायी चटणी

गाजर आणि बिटात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असल्याने ते आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतं. 

गाजर आणि बिटाच्या चटणीची रेसिपी छत्रपती संभाजीनगर मधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.

चटणी तयार करण्यासाठी एक कप खिसलेले गाजर, पाव कप खिसलेले बीट, टोमॅटो, लसूण हे साहित्य लागेल. 

तसेच सुकी लाल मिरची, तेल, जीरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद, गुळ, मीठ हे साहित्यही आवश्यक आहे.

गॅस वरती एक पॅन ठेवून तेल गरम झालं की त्यामध्ये गाजराचा खिस टाकून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा.

खिस मऊ झाला की त्यामध्ये बिटाचा खिस टाकून त्याचा कच्चे पणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. 

लसूण, टोमॅटो, लाल मिरची टाकून मिश्रण एकजीव करायचं आणि त्यात गरजेनुसार लाल तिखट, हळद, मीठ टाकायचं. 

हे मिश्रण थंड झाल्यावर त्याला जिरे, मोहरी आणि हिंग यांचा तडका दिला की चटणी तयार होते. 

पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रांगा