गणेश चतुर्थी दिवशी बाप्पाला या गोष्टी नक्की करा अर्पण

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

काशीचे ज्योतिषी संजय यांनी सांगितले की, गणपतीला विशेष 8 गोष्टी आवडतात.

गणेश पूजेच्या वेळी बाप्पाला प्रिय असलेल्या आठ वस्तू अर्पण कराव्यात.

पूजेदरम्यान गणेशाला केळी, मोदक आणि दूर्वा अर्पण कराव्यात.

याशिवाय त्यांना सिंदूर, नारळ आणि तांदळाच्या लाह्याचा नैवेद्य दाखवावा.

या वस्तू अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा भक्तांवर कायम राहते.

घरात नेहमी डाव्या सोंडेची गणेश मूर्ती स्थापन करावी 

डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा केल्यानं घरामध्ये ऐश्वर्य, समृद्धी आणि सुख-शांती नांदते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)