पाणी पिताना 90% लोक करतात ही चूक आणि बिघडते पोट!

धावत्या जीवनशैलीमुळे पाणी पिण्याच्या माणसाची पद्धतही बदलली आहे. 

बहुतेक लोक विचार न करता पाणी पितात आणि चुका करतात.

चुकीच्या स्थितीत पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, पोटही बिघडते. 

पाणी अन्नप्रमाणे खावे आणि अन्न पाण्याप्रमाणे प्यावे असे म्हणतात. 

म्हणजेच पाणी हे अन्नासारखे हळूहळू प्यावे आणि अन्न पाण्यासारखे लाळेत विरघळवून खावे. 

निवांतपणे पाणी प्यायल्याने शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते.

आयुर्वेदात उभे राहून पाणी पिण्याची सवय देखील चुकीची मानली जाते.

यामुळे पाणी थेट पाचक रस आणि रक्तप्रवाहात जाते, ज्यामुळे समस्या उद्भवतात.

बसून पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.