ढोल ताशा पथकात मराठी कलाकारांचा जलवा!

सगळ्या देशभरात मोठ्या दिमाखात गणेशाचं आगमन झालं आहे. (फोटो - @saneshanshank)

पुण्याच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे ढोल ताशांच्या गजरात निघणारी मिरवणूक. 

पुण्यातील या मिरवणुकीत ढोल ताशांच्या पथकातील मराठी कलाकार नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधतात. (फोटो- @saneshanshank)

या मराठी कलाकारांचं 'कलावंत' नावाचं एक खास ढोल ताशा पथक आहे. 

या  ढोल ताशा पथकात दरवर्षी अनेक मराठी कलाकार सहभागी होत गणरायाची सेवा करतात. 

यंदा देखील गणरायाच्या आगमन सोहळ्यात 'कलावंत' ढोल ताशा पथकात अनेक कलाकार सहभागी झाले होते. (@saneshanshank)

यात प्रामुख्याने अनुजा साठे, श्रुती मराठे या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. (फोटो- @saneshanshank)

तर सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, आस्ताद काळे, तेजस बर्वे या अभिनेत्यांचा समावेश होता. (फोटो- @saneshanshank)

पुण्याच्या मिरवणुकीतील मराठी कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. (@anujasathe)