आता पुण्यात घरीच करा हुरडा पार्टी!

आता पुण्यात घरीच करा हुरडा पार्टी!

थंडीत कुटुंब अथवा मित्रांसोबत हुरडा पार्टी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. 

पुणेकरांना हुरडा पार्टीसाठी आता हॉटेल किंवा शेतात जाण्याची गरज नाही. 

मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येऊन 'हुरडा पार्टी' नावाने नवीनच व्यवसाय सुरू केला आहे. 

ऑर्डरप्रमाणे पुण्यात होम डिलिव्हरी मिळत असल्याने हुरडाप्रेमींना घरबसल्या हुरडा खाता येणार आहे.

अमित मरकड, राहुल जाधव, श्रीकांत जाधव, श्रीकृष्ण थेटे हे चौघे मिळून हा व्यवसाय करीत आहेत. 

मराठवाड्यातून हुरडा आणून पुणे शहरात ऑनलाईन डिलिव्हरीबरोबरच स्टॉलवर विक्रीचा व्यवसाय ते करतात. 

तरुणांना या व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे हुरडा व्यावसायिक सांगतात.

पुण्यात घाऊक बाजारात हुरड्याला 300 ते 350 रुपये तर किरकोळमध्ये 450 रुपये प्रतिकिलो दर आहे.

कोरोना काळात सुरू झालेल्या या 'मराठवाडा हुरडा कंपनी'चा 100 ग्रॅम हुरडा 50 रुपयांना मिळतोय. 

देशी गाईच्या दुधाचं इन्स्टंट आईस्क्रीम