'खुलता कळी खुलेना' नंतर मयुरी देशमुख पुन्हा टेलिव्हिजनवर

खुलता कळी खुलेना या फेमस मालिकेनंतर अभिनेत्री मयुरी वाघ पुन्हा एकदा मराठी मालिकेत कमबॅक करतेय.

खुलता कळी खुलेना या मालिकेतून अभिनेत्री मयुरी वाघनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

मयुरीनं खुलता कळी खुलेना नंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर मयुरी पुन्हा मराठी मालिकेत कधी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत मयुरी दिसणार आहे.

मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे.

मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.

सुखदा या व्यक्तिरेखविषयी सांगताना मयुरी म्हणाली, "मी जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे".

आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले.