आपल्या देशातील बहुतांश लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.
अनेक आव्हानं असताना देखील शेतकरी वर्षानुवर्ष शेती करत आला आहे.
पारंपारिक पिके घेऊन जास्त नफा हाती येत नसल्याने अनेक शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात.
असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे.
एमबीए झालेल्या प्रफुल्ल लाठी याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केली आणि आता ते लाखोंची कमाई करत आहेत.
भोकरदन तालुक्यातील हसनाबादचे रहिवासी असलेल्या मनोज लाठी हे आधी ठेकेदार होते.काही दिवस त्यांनी वीट भट्टीचा व्यवसाय देखील केला.
आणखी देखील काही व्यवसाय करून पाहिले. मात्र त्यात हवे ते यश त्यांना मिळाले नाही.
मग 2017 पासून त्यांनी आपल्या 16 एकर वडिलोपार्जित जमिनीत वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
मनोज लाठी यांचा मुलगा प्रफुल्ल याने वडिलांसोबत सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.
युट्युबवर पाहून मुलाच्या सल्ल्याने त्यांनी छत्तीसगढ येथील रायपूर येथून 1 हजार पेरू रोपे खरेदी केली.
या रोपांची त्यांनी 8 बाय 12 अंतरावर आपल्या शेतात लागवड केली.
यातून लाखोंची कमाई होत आहे.