दूध की अंड? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

अंडी आणि दूध हे दोन्ही भरपूर पोषकतत्त्व असलेले पदार्थ आहेत. परंतु यापैकी कोणता पदार्थ हा शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतो ते जाणून घेऊयात.

एका उकडलेल्या अंड्यामध्ये सुमारे 6.3 ग्रॅम प्रोटिन, 77 कॅलरीज, 5.3 ग्रॅम टोटल फॅट, 212 मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल, 0.6 ग्रॅम कार्ब्ज, 25 मिलिग्रॅम कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन B5, फॉस्फरस, सेलेनियमसह अनेक पोषक घटक असतात.

अंड्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, परंतु त्याचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर कमी परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त नसतो.

परंतु ज्यांना हाय कॉलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांनी अंडी खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एका कप दुधात 8.14 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटिन, 152 कॅलरीज, 12 ग्रॅम कार्ब्ज, 12 ग्रॅम साखर, आठ ग्रॅम फॅट, 250 मिलिग्रॅम कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, रायबोफ्लेविन, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

प्रोटिनसह दूध कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. दुधापासून मिळणारं कॅल्शियम शरीरात सहज शोषलं जातं.

दोघांची तुलना करायची झाल्यास दुधात अंड्यांपेक्षा जास्त कॅल्शियम असतं. तर अंड्यात कोलेस्ट्रॉलचे जास्त प्रमाण असते जे दुधात आढळून येत नाही.

 दोन्हींमध्ये कॅलरीजचं प्रमाण फार जास्त नसतं आणि त्याचं सेवन करणं सुरक्षित मानलं जातं.

तेव्हा तुम्ही दररोज दुधाचे सेवन करू शकता. तर अंड्याचे सेवन करायचे असल्यास आठवड्यातून चार ते पाच अंडी खाणे योग्य ठरते.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा