गोर गरीब मुलांना कराटे शिवणारा तरूण!

कराटे हा तसा मूळचा जपान मधील खेळ. आत्म सुरक्षेचे तंत्र म्हणून याकडे बघितले जाते.

सध्या हाच कराटे एक प्रसिद्ध क्रीडा प्रकार म्हणून समोर येताना दिसतोय. हा खेळ अनेक स्तरांवरती खेळला जातो.

गावपातळीपासून ते इंटरनॅशनल पातळी पर्यंत मोठ्या प्रमाणात हा खेळ खेळला जातो.

याच कराटे खेळासाठी पुण्यातील एका तरूणानं आपलं स्वतःच आयुष्य समर्पित केलं आहे.

हा तरुण गोर गरीब मुलांना कराटे शिकवण्याचं काम करत आहे.

पुण्यातील दुर्गा माता वसाहत म्हणजेच तळजाई परिसरात राहणाऱ्या या तरूणाचं नाव मोहित सेतिया आहे.

या तरुणानं आपलं स्वतःच आयुष्य कराटे या खेळाला समर्पित केलं आहे. मोहितनं आत्तापर्यंत कराटेचे अनेक सामने खेळले आहेत.

यात त्याला जिल्हा पातळीपासून ते नॅशनल पर्यंतचे सर्व पुरस्कार मिळालेले आहेत.

परंतु नाजूक आर्थिक परिस्थिती मुळे मोहित पुढे खेळू शकला नाही. बेताच्या परिस्थितीमुळे मोहित स्वतः च स्वप्न पूर्ण करू शकला नाही.

मात्र आज तो त्याच्यासारख्या अनेक मुलांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतोय.

परसबागेत फुलली शिक्षणाची बाग