पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. कारण पदार्थ देखील तसेच काहीसे वेगळे खायला मिळतात.
पुण्यातील तांबडे जोगेश्वरी जवळ असलेलं सुप्रीम सँडविच गेली 28 वर्ष झालं पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहे.
इथे 150 हुन अधिक प्रकारचे सँडविच खायला मिळतात.
त्यामुळे पुण्यात या सँडविचची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सुप्रीम सँडविचचे मालक संतोष भगत आहेत. त्यांनी सुप्रीम सँडविच या स्टॉलची सुरुवात साध्या सँडविचपासून केली होती.
त्यानंतर काही तरी इनोव्हेटिव्ह सुरु करावं यासाठी त्यांनी ग्रील सँडविच सुरु केले.
परंतु आज जर बघितलं तर 150 हुन अधिक प्रकारचे प्रकारचे सँडविच त्यांच्याकडे मिळतात.
प्रत्येक सँडविच कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि चटणी वेगळी आहे.
परंतु आज जर बघितलं तर 150 हुन अधिक प्रकारचे प्रकारचे सँडविच त्यांच्याकडे मिळतात.
या सँडविचची किंमत 40 रुपयांपासून सुरु होते.