या जीवांना पाहताच मारून टाका, नाहीतर पडेल महागात

अनेकदा तुम्ही आसपास अनेक जीवांना पाहता आणि इग्नोर करता.

परंतु काही जीव हे माणसांसाठी फारच धोकादायक ठरू शकतात. तेव्हा त्यांना पाहताच मारून टाकणे कधीही चांगले.

अधिकतर खेड्यांमध्ये मोकळ्या जागी किंवा फटींमध्ये अनेक कीटक आढळतात. अनेकदा ते माणसांवर हल्ला करतात.

तेव्हा अशा कीटकांना तुम्ही वेळीच मारून टाकणे योग्य ठरते.

भारतात लाल आणि काळ्या रंगाचे विंचू जास्त आढळतात.

विंचू चावल्यास त्यातील विष शरीरभर पसरते आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू होतो. तेव्हा विंचू दिसल्यास त्याला मारून टाका.

विषारी साप चावल्यास वेळीच उपचार मिळाले नाहीत तर माणसाचा मृत्यू होतो.

मच्छर चावल्याने मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरतात. तेव्हा मच्छर दिसताच त्यांना मारून टाकलेले चांगले ठरते.

एशियन जाएंट हॉर्नेट या कीटकांमध्ये विष असते. हे चावल्यावर मानवी शरीरात 8 प्रकारचे टॉक्सिन सोडतात.

या टॉक्सिनमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

मधमाशी चावल्यावर शरीरात इंफेक्शन होऊ शकते.

जगात काही विषारी स्पायडर सुद्धा आहेत. तेव्हा स्पायडर पाहिल्यास त्यांना मारण्याचा सल्ला दिला जातो.