पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राणी कोण? तो साप किंवा विंचू नाही तर....
जर आपण विषारी प्राण्यांबद्दल बोललो तर किंग कोब्रा, स्कॉर्पियन आणि जेलीफिशची नावे पहिली डोळ्यासमोर येतात
पण तुम्हाला माहितीय का की आणखी एक प्राणी यापेक्षाही जास्त विषारी आहे, ज्याच्या विषाचा एक थेंब मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.
हाऊ स्टफ वर्क्सच्या अहवालानुसार, जगातील सर्वात विषारी प्राणी एक गोगलगाय आहे.
त्याचे नाव जिओग्राफी कोन स्नेल आहे, ज्याला कोनस जिओग्राफिकस असेही म्हणतात.
त्याच्या विषामध्ये 100 पेक्षा जास्त विषांचे मिश्रण असते, ज्यामुळे ते खूप स्ट्रॉंग आहे.
हा एक सागरी प्राणी आहे, जो इंडो-पॅसिफिक खडकांमध्ये राहतो आणि माशांची शिकार करतो.
या गोगलगायांमुळे 40 गोताखोरांचा मृत्यू झाला आहे.
याच्या चाव्यानंतर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले नाही तर 65% लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता अधीक वाढते.
त्याच्या विषाचा प्रसार रोखण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कोणतेही औषध अजून पर्यंत मिळालेले नाही