बौद्ध विवाहात मुहूर्त पाहतात का?
बौद्ध विवाहात मुहूर्त पाहतात का?
हिंदू धर्मानुसार विवाहासाठी एखाद्या भटजीकडे जाऊन शुभ दिवस, वेळ आणि मुहूर्त पाहिला जातो.
'मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्ये राधिका आपटेचा बौद्ध विवाह दाखवल्यानंतर ही पद्धती चर्चेत आली.
बौद्ध धर्म विवाह पद्धती बद्दल बऱ्याच जणांना जाणून घेण्याची इच्छा असते.
कोल्हापूरचे बौद्धाचार्य बबलू कांबळे सांगावकर यांनी बौद्ध विवाह पद्धतीबद्दल माहिती दिलीय.
बौद्ध धर्मात कोणतेही विधी करताना स्थळ, काळ, वेळ, मुहूर्त, रुढी, परंपरा पाहिल्या जात नाहीत.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार मनुष्याच्या आयुष्यातील सर्व घटना शुभच असतात.
त्यामुळे सर्वांच्या सोयीची वेळ आणि स्थळ ठरवूनच विवाह सोहळा किंवा इतर कार्यक्रम होतात.
बौध्द धर्मात विवाह करताना पाली भाषेतील गाथा गायल्या जातात.
प्रथम त्रिशरण पंचशिल, बुध्दपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती आदी गाऊन विवाह विधी पूर्ण केले जातात.
आता अर्ध्या तासात विरघळेल बाप्पांची मूर्ती
Learn more