अभिनेत्री मुक्ती मोहनने बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

अभिनेत्री मुक्ती मोहनने बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

अभिनेत्री मुक्ती मोहनने लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली.

मुक्ती मोहननेअभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

लग्नाचे फोटो शेअर करत तिनं 'त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।' असं म्हटलं आहे.

या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

चाहते या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

लग्नात मुक्तीने पेस्टल रंगाचा लेहेंगा, तर कुणालने मॅचिंग शेरवानी घातली होती.

मुक्तीने ‘ब्लड ब्रदर्स’, ‘साहेब, बीवी और गँगस्टर’, ‘हेट स्टोरी’ आणि ‘दारूवू’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

मुक्ती गायिका निति मोहन व डान्सर शक्ती मोहन यांची बहीण आहे.