169 वर्ष जुन्या स्टेशनचा युनस्कोनं केला सन्मान!

मुंबईतल्या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनमध्ये भायखळा स्टेशनचा समावेश आहे.

मध्य रेल्वेचं महत्त्वाचं स्टेशन असलेल्या भायखळाच्या सुशोभीकरणासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आलेत.

या कामाची दखल युनस्कोनंही घेतलीय.

169 वर्ष जुन्या या स्टेशनला युनस्कोचा एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार मिळालाय.

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतातील जुने रेल्वे स्टेशन अशी भायखळाची ओळख आहे.

गेल्या तीन वर्षात या वास्तूची केलेली देखरेख आणि पुनर्संरचना कामासाठी युनेस्कोकडून स्टेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

जायंट्स इंटरनॅशनलचे संस्थापक पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ बजाज ट्रस्ट ग्रुप आणि आभा नारायण असोसिएट्स यांनी सीएसआर स्वरूपात केले आहे.

बजाज ग्रुपचे मीनल बजाज आणि नीरज बजाज आणि जमनालाल बजाज फाऊंडेशन यांनी या वारसा संवर्धनासाठी 4 कोटी दिले.

एप्रिल 2022 मध्ये हे काम पूर्ण झालं. या कामासाठी युनस्कोनं हा पुरस्कार दिलाय.

हौशी कलाकारांसाठी हक्काचं कलादालन!