फॅशन जुनी पण ट्रेंड नवा, पाहा खणाच्या युनिक वस्तू

फॅशन जुनी पण ट्रेंड नवा, पाहा खणाच्या युनिक वस्तू

पूर्वी महिला काष्टा साडी नेसून खणाची चोळी परिधान करत. पण सध्या खणाचा वापर कमी झालाय. 

अलिकडे खणाची जुनीच फॅशन नवीन ट्रेंड बनून मार्केटमध्ये आल्याचे दिसत आहे. 

मुंबईतील आदिती मगदूम ही हीच खणाच्या कपड्याची संस्कृती जपण्याचं काम करताना दिसतेय. 

भांडुपच्या दातार कॉलनी परिसरात असलेले कला बाय नंदा हे आदितीचे कपड्यांचे दुकान आहे. 

आदिती मगदुम व तिची आई नंदा मगदूम या दोघी मिळून कला बाय नंदा हे दुकान चालवतात. 

कॉलेजमध्ये असताना आदितीने खणाच्या विविध वस्तू तयार करणाऱ्या या ब्रँडची सुरुवात केली.

खण हा फक्त चोळीसाठीच मर्यादित न ठेवता, त्यापासून विविध होम डेकोरेशनच्या वस्तू बनवल्या जातात. 

यात 100 रुपयांत खणाची पर्स, बटवा, मोबाईल पाऊच, तर 800 रुपयांत दाराचे तोरण उपलब्ध आहे. 

हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरी