इंजिनिअर तरुणाला लाल परीचा लळा
इंजिनिअर तरुणाला लाल परीचा लळा
प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. काहींना विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते.
मुंबई येथील सॉफ्टवेअर इंजिनियर रोहित धेंडे याला अशी भटकंती करातनाच एसटी बसचा लळा लागला.
रोहित अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बसशी संबंधित प्रदर्शन भरवतो.
जुनी एसटी ते नवीन एसटी असा संपूर्ण एसटीचा प्रवास तो या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडताना दिसून येतो.
एसटीमधील बदल लोकांपर्यंत पोहचेल आणि एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, असं रोहितचं मत आहे.
यासाठी त्याने बस फॉर अस या नावाची एक नोंदणीकृत संस्था सुरू केली आहे.
वर्षातून दोनदा प्रदर्शन भरवणाऱ्या रोहितने एक अवलिया प्रवासी नावानं युट्युब चॅनल बनवलं आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ राबवत असलेल्या अनेक सेवासुविधांची माहिती या चॅनलवर देण्यात येते.
कॅन्सरवर मात करण्यासाठी मांसाहार करावा का?