मुंबईकर तरुणानं दुचाकीवरून गाठलं लंडन

मुंबईकर तरुणानं दुचाकीवरून गाठलं लंडन

मुंबईतील योगेश अलेकरी हा दुचाकीवरून मुंबई - लंडन - मुंबई प्रवास करणारा पहिला भारतीय ठरलाय. 

योगेशने 136 दिवसांमध्ये दुचाकीवरून मुंबई ते लंडन आणि पुन्हा लंडन ते मुंबईचा प्रवास केला. 

विशेष म्हणजे हा प्रवास आशिया व युरोप खंडातील तब्बल 27 देशांतून झाला. 

या प्रवासात 'सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा' आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे संदेश त्याने दिले. 

27 जुलै रोजी मुंबई सेंट्रल येथील राज्य परिवहन विभागातून प्रवासाला सुरुवात केली. 

16 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव काळात लंडन गाठले आणि तेथील भारतीय दुतावासाला भेट दिली. 

योगेशने ब्रायटन समुद्र किनारा, आयफेल टॉवर आणि इतर प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. 

हमास आणि इस्राएलमधील युद्धामुळे परतीच्या प्रवासात त्याला मार्ग बदलावा लागला. 

पाकिस्तानकडून व्हिसा न मिळाल्याने दुबईहून विमानाने कोचीला आणि तेथून दुचाकीने मुंबईला पोहोचला. 

महाराष्ट्रात पिकतेय टरबुजा एवढी संत्री